Pune Railway News: पुणे (Pune) ते लोणावळा (lonavala) दरम्यानच्या सर्व लोकल (Local) 22 ऑगस्टपर्यंत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे(pune railway) विभागाने दिली आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान सध्या 13 जोड्या लोकल धावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात थांबलेल्या सर्व लोकल गाड्या अजून सुरू झालेल्या नाहीत. मात्र 22 ऑगस्टपर्यंत सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जातील. तसंच 8 ऑगस्टपासून आणखी चार लोकल ट्रेन सुरू होतील, तर 15 ऑगस्टपासून सहा गाड्या सुरू होतील.  पुणे-लोणावळा मार्गावरील आणखी चार लोकल ट्रेन 22 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहेत, असं पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले आहे. पुण्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.


97 टक्के एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू
पुणे-मुंबई दरम्यानच्या गाड्यांप्रमाणेच लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल गाड्या शहरांतील दोन्ही  सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहितीही मिळाली आहे. पुण्याहून धावणाऱ्या सुमारे 97 टक्के एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. फक्त काही गाड्या उरल्या असून त्याही लवकरच सुरू होतील, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.


पुण्याहून 20 एक्सप्रेस गाड्या सुटतात
दररोज सुमारे 40,000 ते 50,000 लोक ये-जा करतात. अधिक गाड्या ही प्रवाशांची गरज आहे आणि आमचा रोजचा त्रास कमी होईल, असं मत एका प्रवाशाने व्यक्त केलं आहे. काही गाड्या वगळता एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बेडची सुविधा दिली जात आहे. पुण्याहून 20 एक्सप्रेस गाड्या सुटतात. यापैकी 13 गाड्यांमध्ये सध्या बेडची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच आणखी सात गाड्यांमध्ये बेडची सेवा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. या वर्षी 9 एप्रिल रोजी सर्व गाड्यांमधील बेड रोल सेवा पूर्व महामारीच्या वेळेनुसार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  अनेक बेड रोल खराब झाले आहेत. त्यावर लवकरचं काम करु असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.