Pune Food and Drug Administration Action: दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन 2 लाख 19  हजार 600 रुपये किंमतीचा सुमारे 7 हजार 313 किलो भेसळयुक्त गुळ तर 83 हजार 440 रुपये किंमतीची 2 हजार 750किलो भेसळयुक्त साखर जप्त केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे.


जप्त केलेली साखर नष्ट केली
चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे  कारवाई करण्यात येत आहे.  जानेवारी 2022 मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन 3 लाख 67 हजार 900 रुपये किंमतीचा सुमारे 7 हजार 162किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी 2022 मध्ये हातवळण येथील गुळ उत्पादकावर धाडी टाकुन गुळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.  अन्न व औषध प्रशासने  जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे.


भेसळीबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना घेऊनच गुळ उत्पादन करण्याचं आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे.



नागरिकांच्या जीवाला धोका
चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे.  केली आहे. या सगळ्यांच्या विक्रीमुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुदत संपलेले चॉकलेट विक्रीने देखील बालकांच्या जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने ही करावाई करण्यात आली आहे.