पुणे: पुण्यातील देवाची आळंदी ही वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आहे. मात्र या ठिकाणी वेश्या व्यवसाय आणि दारू धंदे राजरोसपणे चालतात. याबाबत आज कॉंंग्रेसचे कार्यकर्त्यांसह, स्थानिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली, त्याचबरोबर यांचा बंदोबस्त करण्याची थेट मागणी केली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) आळंदीत आले असताना, कॉंंग्रेसचे कार्यकर्ते असून तुमच्याकडे आलो आहे. तुमच्या प्रशासनावरील कामाचा अनुभव आहे, कार्यकर्ते कोण हे न पाहता, आळंदीतील वेश्याव्यवसाय व दारुधंदे बंद कराल या गोष्टींची त्यांनी हक्काने मागणी केली, त्यावर तात्काळ अजित पवारांनी (Ajit Pawar) तातडीनं याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन दिले आहेत.
दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) पुणे दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी आळंदी परिसरात नागरिकांच्या समस्या ऐकल्या. यावेळी पुण्यातील देवाची आळंदी ही वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आहे. मात्र या ठिकाणी वेश्या व्यवसाय आणि बाकी कामे राजरोसपणे चालतात. स्थानिकांनी यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (Ajit Pawar) केली. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील खुलेपणाने याची कबुली दिली. त्याचबरोबर तातडीनं याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे.
देवांच्या आळंदीत चुकीचे धंदे चालत आहेत, वेडे-वाकडे प्रकार होतात. आपण तिथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेंव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागली, लोकं म्हणतील हा कोण लागून गेला. जे ह्याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं. असं भाविक म्हणणार. म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतलं. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक आहे. आता मी पोलिसांना हवं ते देतोय, मात्र त्यांचं काम नाही का? दोन नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, योग्य तो बंदोबस्त लावावा. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही अन करणार ही नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं असे निर्देश अजित पवारांनी (Ajit Pawar) दिले आहेत.