बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष आणि राज्य व राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार कुटुंबातील चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत.

बारामती तालुक्यातून अजित पवारांचे पुतणे रोहित राजेंद्र पवार राजकारणात पाऊल ठेवत आहेत. शिर्सुफळ-गुणवडी जिल्हा परिषद गटातून रोहित पवार यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. रोहित पवार यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार या लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. त्यानंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवारही राजकीय आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे पवार घराण्यातील चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे.

पाहा व्हिडीओ -