पतीसोबत वादानंतर पुण्यात 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2017 12:27 PM (IST)
पुणे : पुण्यामध्ये पतीसोबत झालेल्या वादानंतर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाग्यश्री पवार असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीचं नाव आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. भाग्यश्री यांचा पतीसोबत काही वाद झाला. त्यानंतर सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची माहिती आहे. भाग्यश्री यांच्या घरातून पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये घरगुती वादातून आपण जीव देत असल्याचा उल्लेख केल्याचं वृत्त आहे. भारती विद्यापीठ पोलिस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.