पुणे: पुण्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवारांनी तसे संकेत दिले आहेत. भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रावादीनं एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यामध्ये केलं आहे.
'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाणांशी बोलणं झालं असून येत्या दोन दिवसात आघाडीची चर्चा होऊन निर्णय होईल', असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, 'आपण याआधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधे पुण्यात आघाडीसाठी प्रयत्न केले होते. पण त्यावेळी काँग्रेसचं पुण्यातील नेत्रुत्व आघाडीतील अडसर होत होता. आज ती व्यक्ती आज राजकारणात नाही.' असं म्हणत अजित पवार यांनी सुरेश कलमाडींवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
संबंधित बातम्या:
'मातोश्री'चा जीव फक्त मुंबईमध्येच अडकलेला: अजित पवार