पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये चिमुकलीने बटण सेल गिळल्याची आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

दीड वर्षीय मुलीनं आज सकाळी बटन सेल गिळला असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

क्रांती पवार असं या चिमुकलीचं नाव आहे. क्रांती खेळत असताना तीने रिमोटमधील सेळ गिळला. हा सेल काढण्यासाठी तिच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, पिंपरीत यापूर्वीही सेल गिळल्याचा दोन घटना घडल्या होत्या. ही तीसरी घटना आहे.

यापूर्वी दीड वर्षीय प्रांजलने सेल गिळला होता. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर घनश्याम नावाच्या 6 वर्षीय मुलानेही सेल गिळला होता. डॉक्टरांनी तातडीनं दुर्बिणीने शस्त्रक्रिया करत घनश्यामला जीवदान दिले होते.
संबंधित बातमी

पिंपरीत चिमुरड्याने सेल गिळला, दहा दिवसातली दुसरी घटना