पुणे: थंडीची लाट ओसरून आता तापमानाच्या पाऱ्यामध्ये वाढ होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे.


काल मुंबईमध्ये जानेवारी महिन्यातलं 37.3 इतकं तिसरं उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं. त्यामुळे ऐन हिवाळ्यामध्ये मुंबईत उन्हाळ्याचा अनुभव आला. उत्तरेमध्ये होत असलेली बर्फवृष्टी कमी झाल्यानं, आणि थंड वाऱ्याचा प्रवास थांबल्यानं महाराष्ट्र तापला असल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेनं नोंदवलं.

पुढचे काही दिवस जरी तापमान उतरणार असलं, तरी लवकरच उन्हाची काहिली सुरु होणार असल्याचे संकेतही पुणे वेधशाळेने दिले आहेत.