पुणे: बारामतीमध्ये भरारी पथकानं काल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीची कसून तपासणी केली होती. त्याबाबत आज अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘काल माझी गाडी तपासली, मी तपासून दिली. त्यावेळी बघणारे म्हणत होते की, अजित पवार गाडी कशी तपासू देतात? मी पण सामान्य नागरिक आहे. पण जशी माझी गाडी तपासली तशाच बाकीच्या पक्षातील नेत्यांच्याही गाड्या तपासल्या गेल्या पाहिजेत.’ अशी मागणी अजित पवारांनी त्यावेळी केली.
‘सध्या भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे. पण चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असतात हे देखील भाजपनं ध्यानात ठेवावं.’ असंही अजित पवार म्हणाले.
‘गाडी तपासल्याबद्दल माझी कोणतीही हरकत नाही. पण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हे चुकीचं आहे. भाजपवाले काही सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. परंतु आमची सत्ता आली तरी आम्ही असा डूख धरणार नाही.’ असं सांगायलही अजित पवार विसरले नाही.
काल भरारी पथकानं अजित पवार यांची गाडी थांबवून गाडीची तपासणी केली होती. अजित पवारांनीही भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांच्या गाडीत भरारी पथकाला काहीही संशयास्पद आढळलं नव्हतं.
संबंधित बातम्या:
भरारी पथकाने अजित पवारांची गाडी अडवली!