मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2017 03:30 PM (IST)
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सभा गर्दी अभावी रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सदाशिव पेठेत टिळक रोडवर आयोजित केली होती. मात्र भर दुपारच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवली. मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द झाल्याचं ट्विट केल्यानंतर, सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस सुरु झाला. दुपारच्या वेळेत तेही सदाशिव पेठेत मुख्यमंत्र्यांनी सभा आयोजित करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण असल्याचे मेसेज पुण्यात फॉरवर्ड होऊ लागले. पुणेकरांची 1 ते 4 ही वेळ झोपण्यासाठीच असते, त्या वेळेत सर्व व्यवहार बंद असतात, असे मेसेज यापूर्वीचेच आहेत. मात्र तरीही त्यावेळेत सभा आयोजित केल्याने, मुख्यमंत्र्यांना पुणेरी टोमण्यांना सामोरं जावं लागत आहे. असेच काही सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेले जोक -(हे सर्व जोक सोशल मीडियावरील आहेत) अब की बार कुणाचेही सरकार इथे दुपारी झोपतो मतदार. नवीन पुणेरी पाटी ???????????? मुख्यमंत्री म्हणतात - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ???????????? मुख्यमंत्र्यांच्या सभेला 'पारदर्शक' गर्दी पुण्यात, तेही सदाशिव पेठेत, दुपारी 1 ते 4 मध्ये सभा? कल्पनाच करवत नाही. याला म्हणतात 'हात दाखवून अवलक्षण'. एक तर ते पुणं, त्यात सदाशिव पेठ टिळक रोड आणि वर दुपारी तीन वाजता! ही मुभा तर पेशव्यांनाही नाही!! मुख्यमंत्र्यांची दुपारी एकची सभा रद्द... कोणीही जमलं नाही सभेला...अरे... 1 ते 4 पुणे बंद असत...मग तिकडे मुख्यमंत्रीही असो..... पुणेेरी बाणा शेवटी तो... याला म्हणतात नियम तो नियम... तरी बरं मुख्यमंत्री सभाच घ्यायला गेले... चितळेंकडे बाकरवडी घ्यायला गेले नाहीत