पुणे:  राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे आता संपुर्ण राज्याचं सक्ष लागलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू केली. त्याचबरोबर बैठका, सभा, मेळावे, पक्षांतील पदांवरील नेमणुका आणि पक्षांतर या घडामोडींना वेग आला आहे. अशातच आणखी निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू करा अशा सूचना देतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुका कधी जाहीर होतील त्याचा अंदाज वर्तवला आहे. 


आज पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाचा मेळावा पार पडला यावेळी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, किंवा उशिरात उशिर नोव्हेंबरमध्ये पण माझ्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये निवडणुका येतील. खूप कमी काळ आपल्या हातात आहे. आपल्याला चांगली तयारी करावी लागेल. शिबीर घ्यावे लागेल. आपले मंत्री, नेते आणि पदाधिकारी यांना मोठी तयारी करावी लागणार आहे. आपल्या घरापासून सुरूवात करा त्यानंतर बाकीचे आपल्यासोबत कसे राहतील यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.


सुप्रिया सुळेच्या आरोपांना अजितदादांकडून उत्तर



शनिवारी पुण्यात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक होत होती. जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारही या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की, दोन तास पुतण्यासमोर झालेल्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) गप्प राहिले. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही केलेल्या आरोपानंतर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. पण सुप्रिया काल म्हणाली मी पवार साहेबांचा अपमान केला. मी कधी अपमान केला. उगाच एक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. मी बोलू दिलं नाही, मी निधी वाटपात अन्याय करतो, असे खोटे आरोप करण्यात आले. या अनुषंगाने जो गैरसमज पसरवला जातोय, याची माहिती सर्वांनी घ्यावी. म्हणून मी हे सर्व तुमच्या समोर मांडले.


अजितदादांनी शरद पवार गटात गेलेल्या गव्हाणेंचा विषय कायमचा संपवला



अजित गव्हाणेनी स्वार्थासाठी तुतारी फुंकली. काही जण स्वार्थासाठी हिकडं तिकडं गेले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.आता ही विधानसभा भाजपला सुटणार, मग मी कसा आमदार होणार? असं म्हणणाऱ्यांचा विचार करू नका. अजित गव्हाणेनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तो गेला. आता त्याच त्याला लखलाभ, पण आपल्या पक्षात असणारे आणि तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना समजून सांगा असंही पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. 


 


VIDEO - पिंपरी-चिंचवड येथून अजित पवार गटाचा मेळावा लाईव्ह