पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आईसोबतचा फोटो सोशल मिडिया अकाऊंटवरती शेअर करत त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझ्या आणि आईच्यावतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक - युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे', अशी पोस्ट अजित पवारांनी एक्स (पुर्वीचे ट्विटर)वरती शेअर केली आहे.
‘आई’चा उल्लेख करत अजितदादा भावूक
“लोकसभेला माझं चुकलं. सुप्रियाविरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको हवी होती. मी मागे चूक केली. आता चूक कोणी केली? आई सांगत होती, माझ्या दादाच्या विरोधात उमेदवार देऊ नका. कुटुंब तुटायला वेळ लागत नाही,” असं म्हणत अजित पवार बारामतीत भावूक झाले होते.
युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया
एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, “ती माझी आजी आहे. लहानपणापासून मला आशीर्वाद देत आली आहे. आमचं नातं फार वेगळं आहे, तिला कधी मी कधीच आजीला राजकारणात आणलं नाही. कधी आजीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. मी आजीचं नावंही घेतलं नाही. आमचं नातं, आमि ते वेगळेपण मला ते जपायचं आहे. मला आजीला राजकारणात आणायचं नाही.”