पिंपरी-चिंचवड: देशासह राज्यातील जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून नको त्या विषयांवर सरकार लक्ष केंद्रीत करत असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

 

'राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' म्हणत बसण्यापेक्षा इतर महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे.' असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अहिष्णूता, मनुचे विचार यांवरच बोलत आलं आहे. त्यामुळे राज्य सराकर मुख्य प्रश्नांना कधी सामोरं जाणार असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

 

या मुद्द्यासोबतच कन्हैय्यावर करण्यात आलेल्या चप्पल फेकप्रकरणीही अजित पवारांनी टीका केली. 'कन्हैयाला त्याचा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावर चप्पल मारणे ही आपली सांस्कृती आहे का? तो ही भारताचा एक नागरिक आहे व त्याला बोलण्याचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार राज्य घटनेतच दिला आहे.' असं पवार म्हणाले.