पुणे : पुण्यातल्या बालगंधर्व कलादालनात सध्या सगळीकडे केकच केक पसरलेला दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात इथं तब्बल 2600 किलोंचा केक कापण्यात आला. मात्र कार्यक्रम झाला आणि जमेल तेवढा केक संपवून पालिकेचे अधिकारी निघून गेले. उरलेला केक दालनातच टाकण्यात आल्यानं संपूर्ण कलादालन कमालीचं अस्वच्छ झालं आहे.
पालिकेनं मात्र व्यवस्थापक सुट्टीवर आहेत असं सांगत आपली जबाबदारी झटकली.
नागपूरच्या एका हौशी फोटोग्राफर संस्थेचं इथं प्रदर्शन भरणारा आहे. त्यासाठी काल रात्री 8 वाजताच त्यांना हे दालन दिलं जाणार होतं. मात्र अस्वच्छतेमुळे ते त्यांना अजून मिळालेलं नाही. पालिकेच्या या बेजबाबदारपणावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे.