पुणे : 70 लाख कोटी (Baramati News) वाचवण्यासाठी अजित दादा (Ajit Pawar) तुम्ही भाजपसोबत (Bharatiya Janata Party) गेलात आम्ही कोणाकडे जायचं? आधी आम्हाला फडणवीस (Devendra fadanvis) खोटे वाटायचे पण आता फडणवीस खरे वाटतात तुम्ही आम्हाला खोटे वाटतात, असं म्हणत विजय भोसले (Vijay Bhosle) या तरुणाने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना मतदान करु ना, असं आवाहन तरुणांनी केलं आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी सागर जाधव हा दुधाला दर मिळावा यासाठी उपोषणाला बसला आहे. आजचा त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे. ग्रामस्थांच्या वतीने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुणे बारामती रस्ता रोको करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा तरुण बोलत होता. तसेच अजित पवारांना मतदार करू नये, असं आवाहन या तरुणाने नागरिकांना केलं आहे. या रास्ता रोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही...
दुधाला चाळीस रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सरकारकडं मागणी करत आहे. मात्र सरकार लक्ष देत नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुणे बारामती रस्ता आढळून धरत रास्ता रोको केला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच दूध रस्त्यावर उतरुन जोपर्यंत चाळीस रुपये दर दुधाला मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सागर जाधव यांनी स्पष्ट केलेले आहे.
रस्त्यावरती दूध ओतून देत आक्रोश...
दुधाचा प्रश्न हा फक्त बारामती पुरता मर्यादित नसून राज्यभरातील शेतकऱ्यांची हीच व्यथा असल्याचं जाधव म्हणाले आहेत. सरकारकडून योग्य प्रतिसाद जाधव यांना आतापर्यंत मिळालेला नाही आहे. त्यामुळे हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महिला ग्रामस्थ पुरुष मंडळी वयोवृद्ध उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरती दूध ओतून देत आक्रोश नोंदवला. जोपर्यंत हे दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं सागर जाधव यांनी स्पष्ट केलेला आहे.
इतर महत्वाची बातमी-