पुणे : पुण्यातील वारजे भागातील एका हॉस्पीटलच्या (PMC multispeciality hospital pune) उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे एकत्र आले होते. तेव्हा सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि अजित पवार यांच्यात स्टेजवरूनच वाग्युद्ध पहायला मिळाले.


आधी सुप्रिया सुळे यांनी भाषण करताना वारजे भागातील कैलासवासी अरविंद बारटक्के हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी त्यांच्या नगरसेवकांनी प्रयत्न केल्याचं म्हटलं.  मात्र त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या या दाव्याला हरकत घेतली आणि या हॉस्पिटलचे विस्तारीकरण मी आणि फडणवीस यांनी केले, असा दावा केला. त्याचबरोबर बाहेर या कामाचे श्रेय घेणारे फ्लेक्स लागलेत ते खरे नसल्याचं म्हटल. या भागातील नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपण तर भाजपसाठी चंद्रकांत पाटील यांनी निवडून आणले असून यामधे इतरांचा कोणताही वाटा नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंना टोला लगावला. 


सुप्रिया सुळेंनी रखडलेल्या महापालिका निवडणूका कधी होणार आहेत?, असा प्रश्न भाषणादरम्यान वाचारला. त्यालाही अजित पवारांनी उत्तर दिले आणि सर्वोच्च न्यायालयात ओ बी सी आरक्षणामुळे निवडणूका रखडल्याच म्हटलं.  त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत इतर कोणांकडे लक्ष देऊ नका, अस म्हणत सुप्रिया सुळेंना स्टेजवरुनच आव्हान दिले.


सुप्रिया सुळेंनी या हॉस्पिटलसंदर्भातदेखील टीका केली आहे. या हॉस्टिटलचा कारभार कसा चालणार आहे, यासंदर्भात काहीही माहिती नाही. शिवाय 16 टक्के बेड गरजुंसाठी बेड उपलब्ध करुन दिलेत मात्र 84 टक्के बेड तर कनर्शियल चालवणार आहे. महापालिकेकडून जागा घेऊन सर्व बेड मोफत असणारं रुग्णालय का नाही बांधलं?, असा सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. 


 नमो रोजगार मेळाव्यांतर अजित पवार सुप्रिया सुळे एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर दोघांच्या हालचांलींकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. दोघंही एकमेकांशी बोलतात का?, चर्चा करतात का?, याकडेदेखील लक्ष लागलं होतं. मंचावर अजित पवार आणि सुप्रिया सुळेच्या मध्ये देवेंद्र फडणवीसांची खुर्ची होती. फडणवीस आणि सुप्रिया सुळेंमध्ये काही चर्चा झाल्याचं दिसतंल मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये कोणतंही संभाषण झाल्याचं दिसलं नाही. मात्र याच कार्यक्रमात मंचावरुन दोघांनी एकमेकांवर फटकेबाजी केल्याचं दिसून आलं. एकमेकांचे मुद्दे खोडून काढल्याचं दिसलं. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?