मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2016 02:35 AM (IST)
पिंपरी: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ काल मध्यरात्री कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेला भरधाव वेगात निघालेली एक सँट्रो कार पाठीमागून एका ट्रेलरच्या खाली घुसली. या अपघातात राजेंद्र विष्णु चव्हाण,वनिता चव्हाण, शंकार वनघुले, पूजा वनघूले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.