पुणे : पुण्यात आज पीएमपीएमएल बसच्याबाबतीत आज अनोखा प्रकार घडला. पीएमपीएमएलची बस 100 मीटर विनाड्रायव्हरची धावली. धक्कादायक म्हणजे या बसमध्ये ज्येष्ठ नागरीकांसह 15 ते 20 प्रवासी होते.
काय आहे प्रकरण?
डीएसके विश्व इथं बस थांब्यावर बस उभी करुन ड्रायव्हर बाहेर गेला. मात्र काही वेळातच बसचा हँडब्रेक आपोआप निघाल्याने, बस सुमारे 100 मीटरपर्यंत विनाड्रायव्हर पुढे आली निघाली. बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह 15 ते 20 प्रवासी होते. बसमधील कंडक्टरने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी बस डीएसके विश्व इथं बांधकाम साईटवरील पत्र्याच्या कंपाऊंडला जाऊन धडकून थांबली.
या अपघातात कोणाला मोठी दुखापत झाली नसली, तरी तब्बल शंभर मीटर बस विना ड्रायव्हरची धावल्याने अनेकांच्या जीवाची घालमेला झाली.