मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलावर अपघात झाल्यानं पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बोरघाटात ट्रेलर आणि जीपचा अपघात झाल्यानं ट्रेलर रस्त्यातच आडवा झाला. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारस हा अपघात झाला.
अपघातानंतर पुण्याच्या दिशेने येणारी वाहनं मुंबई मार्गिकेने वळविण्यात आल्यानं मुंबईकडे जाणार्या वाहनांच्या देखील रांगा लागल्या आहेत. रस्त्यात आडवा झालेला ट्रेलर हटवण्यात यश आलं आहे. त्यामुळं आता वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे.