Pune Crime news : पुण्यातील एका सात वर्षीय मुलीचा खेळता खेळता टॉवेलने गळा आवळला गेल्याने मृत्यु झाला आहे. अदिती दत्तात्रय कुलकर्णी असे या सात वर्षीय मुलीचे नाव आहे. तिच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. कुलकर्णी कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे. परिसरातदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलं खेळत असताना डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं अशा घटनांमधून समोर येत आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगी तिच्या घराच्या खिडकीजवळ आणि हॉलमध्ये खेळत असायची. शनिवारी रात्री 5.30 च्या सुमारास खिडकीच्या ग्रीलला लटकत असताना ती टॉवेलने खेळत होती. टॉवेल तिच्या मानेला चिकटल्याने तिचा गळा दाबला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीची आई शाळेत मोलकरीण म्हणून काम करते तर तिचे वडील सुरक्षा रक्षक आहेत. मुलीचा गळा दाबून निधन झाल्याचं झाल्याचे पाहून आजीने मदतीसाठी आरडाओरडा केला. वृद्ध महिलेची कैफियत शेजाऱ्यांनी ऐकताच ते घटनास्थळी धावले. तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या...
मागील काही दिवसांपासून मुलांच्या बाबतील घडणाऱ्या अशा धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. कधी खेळताना तर कधी नदीत पोहताना लहानग्यांचा नाहक जीव जात आहे. य घटनांमुळे अनेक कुटुंबियांवर शोककळा पसरते मात्र या सगळ्या घटना थांबवण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतकंच नाहीतर तर आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, त्यांना टीव्ही आणि मोबाईलद्वारे काय दाखवतो हेदेखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. याची प्रत्येक पालकाने काळजी घेतली पाहिजे.
खेळता खेळता स्वत:लाच लावून घेतली फाशी...
काही दिवसांपूर्वी पिंपरीतून अशीच धक्कादायक घटना घडली होती. खेळण्यातल्या बाहुलीला फाशी दिल्यानंतर एका अल्पवयीन मुलीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. मुलगी आपल्या खोलीत खेळत होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई घरातल्या कामात व्यस्त होती. खेळता-खेळता कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून त्या बाहुलीला फाशी दिली. त्यानंतर बाहुलीचा मृत्यू झालं असं तिला भासलं आणि लगेच या मुलीनेदेखील स्वत:ला तसाच गळफास लावून घेतला होता. आईने मुलगी काय खेळत आहे हे पाहिल्यावर हा प्रकार उघड झाला आला.