हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2017 08:57 PM (IST)
पुणे : देशभरातून पुण्यात दाखल झालेल्या पैलवानांनी बाबूराव सणस मैदानातल्या आखाड्यात हिंदकेसरी किताबासाठी शड्डू ठोकले. भारतातल्या पारंपरिक पद्धतीच्या मातीतल्या कुस्तीत हिंदकेसरी हा सर्वात प्रतिष्ठेचा किताब मानला जातो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं हिंदकेसरी कुस्तीचं यंदा पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतल्या आठ वजनी गटांमध्ये मिळून सुमारे 200 पैलवान सहभागी झाले आहेत. हिंदकेसरी किताबासाठी 130 किलो वजनी गटात कुस्त्या खेळवण्यात येतील. महाराष्ट्राच्या दोन संघांमधून माऊली जमदाडे, किरण भगत, सागर बिराजदार आणि अभिजीत कटके हे चौघं हिंदकेसरी किताबासाठी खेळत आहेत.