पुणे : विद्येचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुण्यामध्ये (Pune) एक लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचं मंदिर मानलं जाणाऱ्या एका शैक्षणिक संकुलात एका 54 वर्षीय प्राध्यापकाने स्वत:पेक्षा निम्म्या वयाच्या प्राध्यापिकेला तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली आहे. दरम्यान संबधित महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. या परीक्षेचे पेपर वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. पुण्यात एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार महाविद्यालयातील प्रोफेसर पेपर तपासल्यानंतर त्याच्याकडे जमा करत होते. पेपर जमा करण्यासाठी या प्राध्यापकाकडे आलेल्या एका 27 वर्षीय प्राध्यापक तरुणीचा त्याने विनयभंग केला. या प्रोफेसर तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिला मिठी मारून हा विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवारी (4 एप्रिल) दुपारच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील एका शैक्षणिक संकुलात घडली आहे..
पोलिसांकडून आरोपीला अटक
या घटनेनंतर संबंधित प्रोफेसर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून संबंधित प्रोफेसर विरोधात तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विकास पवार याला अटक केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut Property Seize by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त
- Maharashtra: मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्याकडून नाराजी व्यक्त
- MNS-BJP : आगामी काळात मनसे-भाजप खरंच एकत्र येणार की छुपी युती साधणार?
- Ajan row in Maharashtra : अजानचा वाद: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या 'या' कृतीची होतेय चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha