पुणे : पुण्यातील नवी पेठ भागात निवडणुकीआधी पत्रकं वाटताना भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे भाजपचे उमेदवार धीरज घाटे यांची पत्रकं वाटताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रभाग क्रमांक 29 हा नवीपेठ-पर्वती भागातील प्रभाग आहे.

पुणे महापालिकेतील 162 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून धीरज घाटे पालिका निवडणूक लढवत आहे. धीरज घाटे यांचे 3 कार्यकर्ते आज रात्री पत्रकं वाटताना पोलिसांना आढळले. त्यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतलं आहे.

नवी पेठेत हे कार्यकर्ते आज पहाटे पत्रकं वाटत होते. त्यांना अटक करुन पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. तसंच निवडणूक आयोगालाही याची माहिती दिली जाणार आहे.