पुणे : पुण्यातील येरवड्यामध्ये महापालिकेच्या शाळेच्या आवारातील खड्डात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. मातोश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुद्र रुपेश चव्हाण आणि रुद्र दत्ता भजुबळ अशी या मुलांची नावे आहेत. काल रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.
पुण्यातील लक्ष्मीनगर येथे मातोश्री इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या वर्गखोल्यांचे काम चालू असल्याने आवारात मोठे खड्डे खणून ठेवले आहेत. काल सुट्टीचा दिवस असल्याने रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी गेट खालून शाळेत आले. क्रिकेट खेळताना बॉल खड्ड्यातील पाण्यात पडल्याने तो काढताना मुले पाण्यात पडल्याचा अंदाज येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ज्या खड्ड्यात ही दोन्ही मुलं बुडाली तो सुमारे दहा फूट खोल खड्डा होता. त्यात सुमारे सहा फूट खोल सांडपाणी जमा झालं होतं. दरम्यान दोघेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. दोघांच्याही दुर्दैवी मृत्यूमुळे रामनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
शाळेच्या आवारातील खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2018 05:16 PM (IST)
पुण्यातील येरवड्यामध्ये महापालिकेच्या शाळेच्या आवारातील खड्डात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. मातोश्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुद्र रुपेश चव्हाण आणि रुद्र दत्ता भजुबळ अशी या मुलांची नावे आहेत. काल रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -