पुणे : पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थ्याला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील वानवडी परिसरातल्या एका शाळेतील मुख्याध्यापकानेच हे घृणास्पद कृत्य केले असून यात समुपदेशिकानेही मदत केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विन्सेट परेरा असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे, तर जॅकलिन वास असं महिला समुपदेशकाचं नाव आहे. हा सर्व प्रकार 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान शाळेतील मुख्याध्यापकाचे कार्यालय आणि रेस्टरुममध्ये घडला असल्याचं पीडित मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपी मुख्याध्यापकाने पीडित विद्यार्थ्याला अश्लील व्हिडीओ दाखवून वेळोवेळी त्याच्याशी अश्लील चाळे केले. याबाबतची सर्व माहिती समुपदेशक महिलेलाही होती. मात्र, तिने याबाबत शाळा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता पीडित विद्यार्थ्याला याबाबत कुठेही वाच्यता न करण्याबाबत दम भरला. त्यामुळे पीडित विद्यार्थी हादरून गेला. सदर बाब विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला.
या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी वानवडी पोलिसात तक्रार दिली असून यासंदर्भात मुख्याध्यापक आणि महिला समुवदेशकाविरोधात Protection of Children from Sexual Offences Act (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
14 वर्षीय मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून अश्लील चाळे, मुख्याध्यापकावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2018 09:49 PM (IST)
शहरातील वानवडी परिसरातल्या एका शाळेतील मुख्याध्यापकानेच हे घृणास्पद कृत्य केले असून यात समुपदेशिकानेही मदत केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -