पुणे : पुण्यातील चाकणमध्ये 17 वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली असून या हत्येचं कारणही चक्रावून टाकणारं आहे. अनिकेत शिंदे असं मृत मुलाचं नाव आहे.
संग्रामदुर्गजवळ एका शाळकरी मुलाची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांसमोर एक भयानक सत्य समोर आलं.
अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपचा एक ग्रुप सुरु केला. पण कालांतराने याच ग्रुपमधल्या सदस्यांचे मतभेद सुरु झाले. एकमेकांना हिणवण्यासाठी आपले स्टेटस बदलण्याचा सिलसिला सुरु झाला एकाने ‘द किंग’ असा स्वतःचा स्टेटस ठेवला. तर त्याला शह देण्यासाठी दुसऱ्याने ‘आपणच बादशाह’ असा स्टेटस ठेवला. याच वादातून ग्रुपमधल्या एका सदस्याने अनिकेतला कुत्रा असे संबोधले आणि वाद विकोपाला गेला.
याच वादातून चाकणच्या भुईकोट किल्ल्यात आमना-सामना करायचं ठरलं आणि तिथेच झटापट सुरु झाली. यातच एकाने अनिकेतला भोसकलं. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला झाला तर त्याच्यासोबत असलेल्या ओंकार हा देखील गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आणखी पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
पण इतक्या किरकोळ कारणावरुन हत्या होत असेल, तर हे पालकांसाठीच नाही... तर समाजासाठी चिंतेची गोष्ट आहे. समाजातलं स्टेटस हे सोशल मीडियावरच्या स्टेटसवर अवलंबून नसतं. हे कुणी तरी सांगण्याची वेळ आली आहे. व्हर्च्युअल गेम्समध्ये सहज एखाद्याला गोळी घातल्याप्रमाणे मुलांनी आपल्याच मित्राचा गेम ओव्हर केला आहे. यामागची भीषणता बहुदा लक्षात येत नाहीये.
पुण्यात व्हॉट्सअॅपच्या स्टेटसमुळे 17 वर्षाच्या मुलाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2018 03:03 PM (IST)
पुण्यातील चाकणमध्ये 17 वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली असून या हत्येचं कारणही चक्रावून टाकणारं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -