पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2017 05:14 PM (IST)
शेक देत असताना शेकोटी अंगावर पडून बाळ भाजल्याची माहिती अगोदर समोर आली होती.
पुणे : शेक देत असताना 11 दिवसांचं बाळ गंभीर भाजल्याप्रकरणी आता वेगळी माहिती येत आहे. ते बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्याच्या बादलीत पडल्याचं समोर आलं. शेक देत असताना शेकोटी अंगावर पडून बाळ भाजल्याची माहिती अगोदर समोर आली होती. चिमुरड्याच्या आईने त्याची मालिश केली आणि सकाळचे कोवळे ऊन देण्यासाठी बालकनीत ठेवलं होतं. आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी घरातच बादलीत हिटर लावलं. काही वेळाने वडिल मोहम्मद शेख हे त्याला आंघोळ घालण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी फरशीवर सांडलेल्या पाण्यावर पाय पडल्याने ते घसरले आणि हा चिमुरडा उकळतं पाणी असलेल्या बादलीत पडला. यामध्ये तो गंभीर भाजला. शेख यांनी त्याला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान त्याला पाण्याबाहेर काढत असताना त्यांचाही हात भाजला.