पुणे: "मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ", असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं.

गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आज पहिल्यांदाज डीएसकेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

डीएसके म्हणाले, “माझ्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता नसल्याचा अफवा पसरत होत्या. आज माझं संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित आहे. मला माझ्या गुंतवणूकदारांना दिलासा द्यायचा आहे. आम्ही कोणाचीही पैसा बुडवणार नाही, आम्ही सर्वांचे पैसे परत देऊ”.

मीडियात निगेटिव्ह बातम्या

मीडियाने मला मोठा केला. वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिली मुलाखत दिली. मीडिया माझा विक पॉईंट आहे. मात्र याच मीडियात सध्या नकारात्मक बातम्या येत आहेत. आम्ही निगेटिव्ह बातम्यांमुळे अडचणीत आलो आहोत. पत्रकारांनी कृपया लिहिताना थोडं भान ठेवावं, कारण तुमच्या लिहिण्यामुळे मी अडचणीत येतो असं नाही, तर माझ्या अडचणीमुळे अनेकांची अडचण वाढते, मग त्यात गुंतवणूकदार, शेअर होल्डर्स वगैरे सर्व आले, असं डीएसके म्हणाले.

आम्ही पैसे जमवत आहोत, आम्ही आमचं काम करत आहोत. माझं आयुष्य ट्रान्सपरंट, पारदर्शी आहे. सगळं जगासमोर मांडलं, असं डी एस के म्हणाले.

आजपर्यंत माझ्याविरोधात एकही तक्रार नव्हती, माझं आयुष्य धुतल्या तांदळासारखं आहे. सर्वांचे पैसे परत करु, असं डीएस कुलकर्णी म्हणाले.

शिवाय मी कोणाची फसवणूक केली असं कोणाला वाटत असेल, तर त्यांनी स्वत:च्या सल्लागारासोबत यावं आणि मला हवा तो प्रश्न विचारावा, त्याबाबत मी स्पष्टीकरण देईन, असं डीएसकेंनी नमूद केलं.



डीएसकेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

डीएसकेंनी कोणाला फसवलं नाही, फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं :

मीडिया, विशेषत: सोशल मीडियातून डीएसके बद्दल चुकीचं वार्तांकन :

आम्ही सर्वांचे पैसे परत करणार, एकाचेही पैसे बुडवणार नाही, डी एस कुलकर्णींचं गुंतवणूकदारांना आश्वासन

विजय मल्ल्यासारखे मी कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही :

आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार

निगेटिव्ह बातम्यांमुळे अडचणीत आलो

माझं आयुष्य ट्रान्सपरंट आहे, सगळं जगासमोर मांडलं

डी एस कुलकर्णीनं कुणाला फसवलं नाही, मल्ल्या पळाला मात्र डीएसके पळाला नाही

एकाही गुंतवणूक दाराचे पैसे बुडवणार नाही

संबंधित बातम्या 

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट