पुणे : 10 दिवसांच्या मुलीला रिक्षातून पळवून नेल्याची घटना पुण्यात घडली आहे. सहप्रवासी महिलेने मुलीला पळवून नेले. पुण्यातील बोपोडीमध्ये सकाळी ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
एक महिला आपल्या दहा दिवसांच्या मुलीला रिक्षातून डॉक्टरकडे जात होती. यावेळी रिक्षातील सहप्रवासी महिलेने ते बाळ हिसकावलं आणि बाळाच्या आईला रिक्षातून बाहेर ढकललं.
दरम्यान, खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अपहरणाचं प्रकरण असल्याचे समोर आले आहे.