पुणे : बँक खात्यांमध्ये पैसे भरणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे रांगेत उभे असताना एक लाख 30 हजार रुपये लंपास झाले आहेत. पुण्याच्या आळेफाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत ही घटना घडली आहे. अवघ्या 45 सेकंदात झालेली ही चोरी सीसीटीव्हीतदेखील कैद झाली आहे.


बाळू पांडेकर हे खात्यात पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी आलेल्या खातेधारकांची मोठी रांग होती. पांडेकर त्या रांगेत उभे राहिले. आपला नंबर येण्यास अद्याप खूप वेळ असल्यामुळे ते मोबाईलमध्ये दंग झाले. याचा फायदा घेत त्यांच्या मागे उभे असणाऱ्या एका अज्ञाताने हातचलाखी केली आणि बाळू यांच्या हातातील पिशवीतून एक लाख 30 हजार रुपये घेऊन पोबारा केला.

व्हिडीओ पाहा



अवघ्या 45 सेकंदाच्या चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पांडेकर यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आळेफाटा पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

गुंडापाठोपाठ महिला चोरांचाही सुळसुळाट, मंदिरात महिलेची चोरी | नाशिक | ABP Majha 



चोरीचा मोबाईल परत मिळवणं आता सहज शक्य | ABP Majha