सोलापूर : हिंदू-मुस्लिम हे भाई भाई आहेत, सर्वांचे रक्त लालच आहे असं सांगत अजितदादांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजासोबत राहा असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी दिला. पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये नमाज पडल्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाजपच्या नेत्यांनी मुस्लिम समूदायावर टीका केली होती. त्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

Continues below advertisement


एका बाजूला शनिवार वाडा प्रकरणात भाजपकडून मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीने मात्र मुस्लिमांच्या सोबत उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंभुर्णी येथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुस्लिम समाजाला सोबत घेऊन पुढे चला असा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.


NCP On Shaniwar Wada Namaj Pathan : सर्वांचे रक्त लाल


माध्यमांशी बोलताना शनिवार वाडा प्रकरणावरून दत्तात्रय भरणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुस्लिम समाजाच्या बाबतीत अजितदादांची भूमिका रोखठोक आहे.  हिंदू-मुस्लिम सगळे भाई भाई आहेत. सर्वांचं रक्त लालच आहे असे उत्तर देत दत्तात्रय भरणे यांनी भाजपच्या भूमिकेला विरोध दर्शविला. 


Pune Shaniwar Wada News : दलित आणि मुस्लिमांच्या सोबत राहा


यापूर्वीही काही जणांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. तेव्हा देखील अजितदादांनी चोख उत्तर दिल्याची आठवण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी करून दिली.  पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी मतदारांना जवळ करण्याच्या सूचना दिल्या. तसेच दलित आणि मुस्लिम यांच्यासोबत राहा असा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. 


Solapur Elections : महापालिकेत स्वतंत्र लढण्याची तयारी करा


सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र निवडणुकीची तयारी करा.  सोलापूर महापालिका निवडणुकीत सर्व 26 प्रभाग आणि 102 सदस्यांसाठी तयारी करा अशा सूचना दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 


Solapur Politics : पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा विचार करणार


पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आलं. आगामी काळात त्यांच्या सूचनांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल. महायुतीमध्ये निवडणूक लढवायची आमची इच्छा आहे."


ही बातमी वाचा: