Yogesh Kadam and Uddhav Thackeray: नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची बुधवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नुकतीच नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी आपण पक्षात नाराज असल्याचा सूर लावला होता. बडगुजर यांच्या या नाराजीची आगामी वाटचाल कुठे होणार, हे ओळखून उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी तडकाफडकी बडगुजर यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला. याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे नेहमीच सूडाचे राजकारण करत आले आहेत, असे त्यांनी म्हटले.

उद्धवजी कायमचं सुडाचं राजकारण करत आले आहेत. आम्ही ते लहानपणापासून बघत आलो आहोत. शिवसेनेच्या तत्कालीन एका आमदाराने राज ठाकरेंना मुलाची लग्नाची पत्रिका दिल्याचे समजताच रागातून भर रस्त्यात उद्धवजी यू टर्न मारून गेले होते. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एखादं कामाचं पत्र दिलं तर हरकत काय आहे. उद्धवजी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतात ते चालतं, मग कार्यकर्ता कामासाठी गेला तर हरकत काय आहे. हीच बाब लक्षात घेऊन आज अनेकांनी शिंदेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे योगेश कदम यांनी म्हटले.

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा स्वभाव माहित आहे. उद्धवजींमुळेच राज ठाकरेंनी पक्ष सोडला होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र दोघेही एकत्र आले तरी महायुतीवर काही परिणाम होणार नाही, असेही योगेश कदम यांनी म्हटले. आमच्या भरतशेठ गोगावले याचं फिल्मी स्टाईलने वावरणं असते. दिलखुलास व्यक्ती आहे जे पोटात तेच ओठात अशी व्यक्ती आहे. भरतशेठ यांना पालकमंत्रीपद मिळायला हवं, त्याना जेव्हा पालकमंत्रीपद मिळेल तेव्हाच त्यांच्या राजकीय संघर्षाला न्याय मिळेल, अशी भावना योगेश कदम यांनी बोलून दाखवली.

Jalindar Supekar: चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जाणार नाही, जालिंदर सुपेकरांबाबत गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. या गुन्ह्यांचा तपास कुणाच्याही दबावाखाली होणार नाही. त्या अनुषंगाने सुपेकर यांची बदली असावी. मात्र, एका अधिकाऱ्याकडून चुकीच्या गोष्टींना वाव दिला जात असेल तर अशा गोष्टी पाठीशी घातल्या जाणार नाही. याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत, असे योगेश कदम यांनी म्हटले. 

केंद्रीय तपासयंत्रणेकडून पहलगामच्या घटनेनंतर काही माहिती येत आहेत त्या अनुषंगाने राज्यात ही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. जी संशयास्पद ठिकाणं आहे त्या ठिकाणी राज्य असो किंवा केंद्र आम्ही सामूहिक कारवाई करत आहोत. भारत पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा अनेक हेरगिरीची अनेक प्रकरणं समोर आली आहे. पहलगामची घटना असो किंवा युद्धजन्य परिस्थिती असो या कोंबिग ऑपरेशनला नक्कीच महत्व आहे. 

आणखी वाचा

चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा, संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, सोमवारी प्रवेश निश्चित!