पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला 2022 मध्ये शस्त्र परवाना देण्यात आला होता. मात्र हा परवाना देण्याआधी काही महिने त्याच्यावर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी शस्त्रपरवान्याचा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयामध्ये अपील करुन शस्त्रपरवाना मिळवल्याचं सांगण्यात येतं आहे. निलेश चव्हाणला पुणे पोलीसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून तो मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. पोलिसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर त्या व्यक्तीला मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते. मंत्रालयात उपसचिव किंवा गृहराज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन त्याबाबत निर्णय घेतला जातो, अशी माहिती आहे. 

Continues below advertisement

शस्त्र परवाना देण्याआधी काही महिने त्याच्यावर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी शस्त्रपरवान्याचा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयामध्ये अपील करुन शस्त्रपरवाना मिळवल्याचं सांगण्यात येतं आहे. निलेश चव्हाणला पुणे पोलीसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून तो मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली, अशी चर्चा आहे. निलेश चव्हाणच्या शस्त्रपरवान्याचा आयुक्तांनी अर्ज फेटाळला होता, मात्र, त्याने मंत्रालयातून शस्त्र परवाना मिळवला आहे. पुणे पोलीसांनी आधी चव्हाणचा अर्ज फेटाळला होता, अशी माहिती आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण याने पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता. पोलिसांनी त्याचा अर्ज सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळला. यानंतर चव्हाणने गृह विभागात अपील केले. 

Continues below advertisement

पोलिसांनी चव्हाणकडे केलेला तपास व जप्त मुद्देमाल

- पंचनाम्याद्वारे चव्हाणचा मोबाईल, पासपोर्ट, लॅपटॉपसह पिस्तूल जप्त.- गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची नोंदणी प्रत प्राप्त करण्यात आली आहे.- शशांक आणि वैष्णवी यांचे मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट स्क्रीनशॉट जप्त.- लता, करिष्मा आणि शशांक यांचे मोबाईल चव्हाणकडून जप्त.- चव्हाणने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी चिथावणी दिली.

निलेश चव्हाणकडून या गोष्टींचा केला जाणार तपास

वैष्णवीचे बाळ ताब्यात असताना चव्हाणने बाळाशी कोणत्या प्रकारची गैरवर्तणूक केली का? त्याने कोणत्या कारणांस्तव अनधिकृतपणे बाळाचा ताबा घेतला? निलेश आणि इतर आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले? चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील सदस्य यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यातून हा गुन्हा करण्यात आला आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. 

निलेशच्या घरात पोलिसांना काय सापडलं?

निलेशच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल आणि पासपोर्ट या वस्तू जप्त केल्या. पोलिसांकडून निलेशची कसून चौकशी केली जाते आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरी आढळून आले. निलेश चव्हाणकडून याआधी 3 मोबाईल जप्त केले. शनिवारी आणखी 3 फोन जप्त केले. जप्त मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती बावधनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.