मुंबई: खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतेच नगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उद्देशून लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजवा असं म्हंटलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्या. 


खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात निलेश लंके यांना सूचक इशारा करत लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात लंकेच्या घरवापसीच्या बातम्या सुरु झाल्या. लंके यांचा पुण्यात प्रवेश होणं अपेक्षित होतं परंतु काही कारणास्तव हा प्रवेश आता पुढे गेल्याची सूत्रांची माहिती आहे. 


निलेश लंकेंची घरवापसी का?


1) महाविकास आघाडीत जर नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यास निलेश लंके उमेदवार असण्याची शक्यता. 


2) अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला असला तरी पहिल्यापासून लंके यांनी दोन्ही गटाशी जाणीवपूर्वक जुळवून घेतल्याची चर्चा.


3) सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांचा फोटोंचा वापर.


4) नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्यासमोर महाविकास आघाडीत आवाहन निर्माण करण्याची ताकद निलेश लंके यांच्याच असल्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा. 


निलेश लंके यांचा आज होणारा पक्षप्रवेश सध्या जरी लांबला असला तरी लवकरच ते आमच्यासोबत असतील अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. आज सकाळची पुण्यातील शासकीय विश्रामगृहात आमदार निलेश लंके आणि खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाली आणि त्यामध्ये नगरच्या जागेच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. 


एकीकडे लोकसभेच्या तिकिटासाठी अमोल कोल्हेंच्या माध्यमातून निलेश लंके यांनी फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे निवडून येण्यासाठी भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यााशी देखील चांगलीच जवळीक वाढवली आहे. जर निलेश लंके जर पवारांसोबत आले तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 6 आमदारांपैकी 3 आमदार शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत.


एकीकडे निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली असताना दुसरीकडे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आपल्या मुलाला पुन्हा लोकसभेची संधी मिळवण्यासाठी दिल्ली वाऱ्या वाढवल्याचं पाहिला मिळत आहे. जर पुन्हा सुजय विखे यांनाच संधी मिळाली तर नगर दक्षिणची ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. 


ही बातमी वाचा :