मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राजकीय वर्तुळात वारंवार चर्चेत असतात. कधी ते दिल्लीवारीमुळे (Delhi Visit) असतील किंवा त्यांच्या दरे गावी जाण्यामुळे असतील. गेल्या काही महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी चांगलीच चर्चेत आली होती, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वारंवार दिल्लीला (Delhi Visit) का जातात हे त्यांनीच स्पष्टपणे एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस जेवढे दिल्लीत जात नाही तेवढे शिंदे दिल्लीत जातात, तुमची दिल्लीवारी फार वेळा होते, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता मी दिल्लीला गेलो, गावाला गेलो, काश्मीरला गेलो, तरी सगळ्यांना पोटदुखी होते. (Delhi Visit)
दिल्लीला का जातो?
आता काही दिवसांपूर्वी दिल्लीला अधिवेशन सुरू होतं त्यावेळी मी दिल्लीत खासदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीसाठी गेलो होतो. काही इतर राज्यातील आमचे राज्य प्रमुख आहेत, त्यांची बैठक दिल्लीत होते, त्यांना दिल्लीत यायला सोपं पडतं आणि जेव्हा दिल्लीला मी राज्यासाठी, काही मागण्यासाठी, काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी जातो. तर दिल्लीत जाण्यासाठी काय गैर आहे. आपल्या राज्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा मी केंद्र सरकारकडे काही प्रश्न प्रलंबित असतात त्यासाठी जातो, आणि त्या जाण्यामध्ये काय वावगं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान राज्याच्या विकासासाठी मोठे आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी दिले होते, मग का दिल्लीला जाऊ नये. दिल्लीला मी बाकी लोकांसारखा लपून-छपून जात नाही. आम्ही उघडेपणांनी जातो, जे काय असतं ते सर्वांच्या समोर असतं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचं काय होणार?
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार असे चित्र निर्माण झाले आहे याबाबतच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणामध्ये कोणी कोणाच्याही बरोबर जाऊ शकतो. कोणी कोणाबरोबरही युती करू शकतो. आज त्याचा अधिकार आहे. आमची महायुती आहे. महायुतीत आम्ही लोकसभा जिंकली. महायुतीने विधानसभा जिंकली आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.