कोल्हापूर: इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा गुन्हा असलेला प्रशांत कोरटकर याला सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात अटक केली होती. त्यानंतर प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्या मुसक्या आवळून त्याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. प्रशांत कोरटकर हा संपूर्ण वेळ वकिलांच्या युक्तिवादाकडे बारकाईने लक्ष ठेवून होता.
यावेळी प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. दाखल गुन्ह्यातील कलम 7 वर्षाच्या आतील शिक्षेची आहेत. दाखल केलेल्या कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती. तरीही कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक करण्याचा अट्टाहास केला. ही सगळी मीडिया ट्रायल सुरु आहे. कोरटकर यांना पोलिसांनी कधीच व्हाईस सॅम्पल द्यायला बोलावलं नाही. सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले कोर्टाकडे मेल केले आहेत. कोरटकर यांचा व्हिडीओ आणि ऑडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. तक्रारदार यांनी आधी ऑडिओ व्हायरल केला आणि संध्याकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. इंद्रजीत सावंत यांनी आधीच पोलिसांत जायला हवे होते. मात्र, तसे न करता त्यांनी आधी प्रशांत कोरटकर यांचा ऑडिओ व्हायरल केला. यामागील फिर्यादीचा हेतू काय होता हे तपासावे लागेल, असे प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी म्हटले.
इंद्रजीत सावंतांचे वकील असीम सरोदेंचा जोरदार युक्तिवाद
यावेळी इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी व्हावी. आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली. इंद्रजीत सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात. तिथे अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजीत सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल ऑडिओ क्लिप मी व्हायरल करणं हे शक्य नाही. ते व्यथीत झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना काही बोलले जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊ बाईसाहेबांविषयी त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही. स्वातंत्र्याचा गैरवापर करतात, त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे. आपण काही बोलायचं मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही हे अत्यंत चुकीची भूमिका आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले.
जसा आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, वरिष्ठ काही नाव आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली ते कुठे कुठे जेवले इनफॅक्ट माझा तर म्हणणे काय काय जेवले या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणे आवश्यक आहे. कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या व्यथित झालेल्या असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते. सगळीकडे आणि अक्षरश: चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असे म्हणतात. त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशन मधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सीसीटीव्ही फुटेजही कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली.
आपण फरार आहे आणि आपण कोणत्या प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही. कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे, अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे. मुळात मी सुरुवातीपासून हे सांगतोय की, यांची लढाई माझी लढाई किंवा आम्ही सगळेजणचे लढतो आहे. ही लढाई प्रशांत कोरटकर व्यक्तीविरुद्ध नाही आहे, ही प्रवृत्ती चुकीची आहे. कोणी कसेही बेताल वक्तव्य करेल कोणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर महाराष्ट्रात चालणार नाही हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची होईल, असे सरोदे यांनी म्हटले.
सरकारी वकील कोर्टात काय म्हणाले?
आरोपी प्रशांत कोरटकर याने मोबाईलमधील डेटा डिलिट केला आहे. त्याने असे का केले, याचा तपास करावा लागणार आहे. आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल्स घ्यायचे आहेत. आरोपी एक महिन्याने पकडला गेला. या काळात त्याला कोणी मदत केली, याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोपीकडे चौकशी करावी लागेल. पळून जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला त्याचा मालक कोण आहे याचा ही शोध घ्यावा लागणार आहे. या आरोपीला ७ दिवसाची पोलीस कोठडी मिळावी. आवाजाचे नमुने घ्यायचे असेल तर कोर्टला ऑर्डर करावी लागेल. आरोपीचे म्हणणे आहे की हा माझा आवाज नाही. त्यामुळे डिटेल चौकशी करायची आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
आणखी वाचा