Rohit Pawar News : राज्याच्या राजकारणातील सध्याचा चर्चेचा एक विषय विजय शिवतारे (Vijay Shivtare) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) संघर्ष. एकीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात बारामतीतून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढण्याची शक्यता असून दुसरीकडे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Election) लढवणार अशी घोषणा केली. यानंतर महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. आता विजय शिवतारेंचा बोलविता धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) केला आहे. रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विजय शिवतारेंचा बोलविता धनी एकनाथ शिंदे?
शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात पवारांना बाजूला ठेवा असं वक्तव्य केलं. यावर कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, शिवतारे महायुतीत आहेत, त्यामुळे सुप्रियाताई यांच्यावर बोलणं साहजिक आहे. मात्र तेच जर अजितदादा गटावर बोलत असतील तर, त्यांना एकनाथ शिंदे यांनी बोलायला सांगितलं की, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी बोलायला सांगितलं आणि मुद्दामून वाद निर्माण करायचा आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचं म्हटलं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
'अजित पवार गटातील नेते भाजप चिन्हावर लढण्यास इच्छुक'
लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये धुसपुस पाहायला मिळते, यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून जागा वाटपावरून महायुतीत वाद वाढणार असल्याचे म्हटलं आहे. भाजप आणि शिंदे यांच्या गटात वाद सुरू झालेला आहे, यासोबतच अजितदादा गटाच्या आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढाईची आहे. यासाठी 12 आमदार तयार असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळेच अजितदादा गटाच्या 22 आमदारांना शरद पवार गटात यायचं असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
'भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन संपवलं'
रोहित पवार पुढे म्हणाले की, भाजप लोकमत असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन संपवतात, हे आम्ही आधीपासून सांगत आहोत. भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन राजकीय दृष्ट्या संपवलं, मात्र हे एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांना लोकसभेच्या नऊ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना आता चार मिळत आहेत तर, विधानसभेला 90 जागा मिळतील, अशी अपेक्षा असताना कोणताही उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल का, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच 12 लोक भाजपमध्ये निवडणूक लढतील आणि 22 जण पुन्हा साहेबांकडे वापस जावेत, अशी इच्छा व्यक्त करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :