कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय बदल घडत असताना भाजपचे दिग्गज नेते शुभेंदू अधिकारी आता राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे शुभेंदू अधिकारी हे आता बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहे. दरम्यान, त्यांच्या संपत्तीची माहितीही आता चर्चेचा विषय ठरत आहे.(Bengal New CM Suvendu Adhikari Networth)

Continues below advertisement

Suvendu Adhikari Networth: त्यांच्या नावावर कोणतीही कार नाही सोने किंवा दागिने नाहीत

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, शुभेंदू अधिकारी यांची एकूण संपत्ती सुमारे ८५ लाख ८७ हजार रुपये इतकी आहे. यात चल आणि अचल संपत्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर कोणतीही कार नसून त्यांनी सोने किंवा दागिन्यांचीही नोंद केलेली नाही.(Bengal New CM Suvendu Adhikari Networth)

Suvendu Adhikari Networth: रोख स्वरूपात केवळ १२ हजार रुपये 

प्रतिज्ञापत्रानुसार, शुभेंदू अधिकारी यांच्याकडे रोख स्वरूपात केवळ १२ हजार रुपये आहेत. त्यांच्याकडे स्वतःची खासगी कार नाही. तसेच सोने किंवा दागिनेही नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या चल संपत्तीची एकूण किंमत सुमारे २४ लाख ५७ हजार रुपये आहे.त्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक तसेच काही सहकारी बँकांमध्ये मिळून १४ बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ७ लाख ३४ हजार रुपयांची ठेव असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

Continues below advertisement

याशिवाय त्यांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये आणि किसान विकास पत्रामध्ये २ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर सहा एलआयसी पॉलिसी असून त्यांची किंमत सुमारे ७ लाख ७१ हजार रुपये असल्याचे सांगितले गेले आहे.

Suvendu Adhikari Networth: वडिलोपार्जित घरात त्यांचा हिस्सा अन् फ्लॅट्स 

शुभेंदू अधिकारी यांच्या अचल संपत्तीची किंमत सुमारे ६१ लाख ३० हजार रुपये आहे. त्यांची बहुतांश मालमत्ता पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आहे, जो अधिकारी कुटुंबाचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. नंदीग्राममध्ये त्यांच्या नावावर सुमारे ९ लाख रुपयांची शेतीजमीन आहे. तसेच पंचदरिया आणि धर्मदासबर भागात बिगरशेती जमीन असून तिची किंमत सुमारे २७.५ लाख रुपये आहे. तामलुक आणि कुमारपूर येथे त्यांचे फ्लॅट्स आहेत, तर करकुली येथे वडिलोपार्जित घरात त्यांचा हिस्सा आहे. या निवासी मालमत्तेची एकूण किंमत सुमारे २४ लाख ७५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न १७ लाख ३८ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. आमदार म्हणून मिळणारे वेतन, खासदार निवृत्तीवेतन आणि व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज किंवा देणी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करून चर्चेत आलेले शुभेंदू अधिकारी आता बंगालची सत्ता सांभाळण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे.