सांगली : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक (Election) प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. त्यामुळे, पश्मि महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील येथील 11 मतदारसंघात शेवटच्या सभा होत असून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी आज सांगली गाठली. सांगलीतील (Sangli) महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे सांगलीत आले होते, यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमही व्यासपीठावर होते. आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भाषणाच्या अगोदर एबीपी माझााशी संवाद साधला. त्यावेळी, भाषणापूर्वी सुरुवातालीच विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर, विशाल पाटील हे भाजपाची बी टीम असल्याचा घणाघात करत सांगलीत ठाकरेंनी प्रचाराची सुरुवात केली.


महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीतील जागा शिवसेनेला गेल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी काँग्रेसकडून ही जागा आमच्या हक्काची असल्याचा दावा करत या जागेवरुन काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार अशी घोषणा सातत्याने करण्यात येत होती. तर, स्वत: विश्वजीत कदम हे विशाल पाटलांनी घेऊन दिल्ली दरबारीही जाऊन आले. मात्र, शिवेसनेनं या जागेवरुन चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेस व शिवसेना वाद रंगल्याचं दिसून आलं. अखेर, या वादावर वरिष्ठांनी पडदा टाकला अन् ही जागा शिवसेनेलाच देण्यात आली. त्यानंतर, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत येथून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तरीही, विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना व काँग्रेसला होती. मात्र, विशाल पाटील ह्यांनी शेवटपर्यंत बंडाचे निशाण कायम ठेवले. त्यामुळे, सांगलीत यंदा तिहेरी लढत होत आहे. मात्र, विशाला पाटील यांची उमेदवारी भाजपाला फायदा करण्यासाठी असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यावरुनच, आदित्य ठाकरेंनी आपल्या सांगली दौऱ्यात भाषणापूर्वीच विशाल पाटील हे भाजपाची बी टीम असल्याचा हल्लाबोल केला.  तसेच, तुमच्या घरी भाजपचे लोक येतील, बी टिमचे लोक येतील त्यांना सांगा 400 पार कसे करणार, असेही आदित्य यांनी म्हटले.



आदित्य ठाकरे काय म्हणाले


- विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे हे स्पष्ट आहे
- आमचा उमेदवारच निवडून येणार
- ⁠निकालाच्या वेळी तुम्ही पहाल तर सर्वाधिक जागा या महाविकास आघाडी आणि इंडीया आघाडीच्या येतील
- ⁠कोणी किती ही सभा घेतल्या तरी फरक पडत नाही
- ⁠मोहीत कंबोज काय बोलतात याकडे मी लक्ष ही देत नाही



आदित्य ठाकरे


- तिसरा टप्याचील शेवटचा दिवस आहे
- ⁠बाहेर उष्णता वाढता आहे तशीच राजकीय तापा तापी आहे
- ⁠किती ही उष्णता असली तरी आपल्या सभेला गर्दी होते याचा अर्थ. आपला विजय आहे
- ⁠लोकांना तहान भुख लागली तरी हालत नाही कारण त्यांना इंडीया आघाडी सरकार आणण्याची भुक लागली आहे
- ⁠ महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या जागा येतीस
-  तुमच्या घरी भाजपचे लोक येतील बी टिमचे लोक येतील त्यांना सांगा ४०० पार कसे करणार
- भाजपची तानाशाहीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे त्यामुळे दिल्लीत सर्व जागा आप आणि काॅग्रेस जिंकणार आहे
- ⁠भाजपला मी विचारत आहे की तुम्ही काश्मीरमध्ये का लढत नाही 
- ⁠खा तुम्हाला उमेदवार मिळत नाही


- हातात मशाल आहे 
- ⁠त्यामुळे मशालला निवडून द्या 
- ⁠विश्वजीत कदम आणि माझी मैत्री घट्ट आहे
- ⁠शिवसेना ही एकच आहे बाकी त चिंधीचोराची आहे
- ⁠भाजप आता प्रचार करत आहे की महाविकास आघाडी मांस मटन खाणारे आहे
- ⁠चिखलात कमळ फुलत असतं त्यामुळे तुम्ही ही चिखल साफ करणार की नाही


विश्वजीत कदम काय म्हणाले


- चंद्रहार लक्षात घ्या की शेवटच्या दिवशी पक्षाचे प्रमुख आपल्या सभेला येत असतील तर लक्षात घ्या की आपल्या किती पाठीशी आहेत
- ⁠मागच्या घडामोडी संदर्भात मला फार काही बोलायच नाही
- ⁠मी माझ्या पद्धतीने सर्व प्रयत्न केले 
- ⁠उद्धव ठाकरे यांचा ज्यांनी विश्वासघात केला त्यांना बाजूला ठेवून ते कांग्रेस सोबत आले
- ⁠हा धोक्याचा वचपा काढण्यासाठी ते आमच्या सोबत आले
- ⁠महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावानं त्यांनी पहिली शेतकरी कर्ज माफी योजना सुरु केली
- चंद्रहार पाटील शेतकरी कुटुंबातील पहिलवान आहे
- ⁠ब्लड डोनेशनच त्यांनी काम करुन देशाच्या आर्मिला रक्त दोण्याच काम त्यांनी केल
- ⁠राजकारणात आमचा हा नवखा उमेदवार आहे
- ⁠त्याच्या पद्धतीने ते चांगलं क म करत आहे
- ⁠आजही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे