Vijay Wadettiwar on Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी चुकीचे वक्तव्य करून भूल थापा मारू नये. 2 सप्टेंबरच्या जीआरचा विषय न्यायप्रविष्ठ असला तरी त्या विरोधातील याचिका आमच्याच (ओबीसी कार्यकर्त्यांच्या) आहेत, जीआर रद्द झाला तर त्या याचिका ही मागे घेतल्या जातील, त्यामुळे जीआरचा विषय न्यायप्रविष्ठ आहे, असं विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बोलून जीआरमध्ये बदल करण्यास नाकारणे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. नागपुरात आज होणाऱ्या ओबीसी मोर्चापूर्वी (OBC Protest) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar on OBC Protest)यांनी हि महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on OBC Protest: ज्यांना ओबीसी हित साधायचे आहे, त्यांनी या मोर्चात यावं

ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचे पलीकडे जाऊन समाजासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. आमदारकी पेक्षाही मला ओबीसी समाज महत्त्वाचा आहे. त्यामुळेच कुठेही ब्रँडिंग न करता, कुठे ही स्वतःचा फोटो न लावता मोर्चा आयोजित केला आहे. ज्यांना ज्यांना ओबीसी हित साधायचे आहे, त्यांनी या मोर्चात यावं. आम्ही कोणालाही निमंत्रण दिलेले नाही. कारण हे काही लग्न नाही, कोणाचं बारसं नाही. हा एक ऐतिहासिक मोर्चा ठरेल, सरकारला पुनर्विचार करायला लावणारा हा मोर्चा ठरेल. अशी प्रतिक्रियाही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. मराठा जीआर विरोधात न्यायालयात आम्हीच गेलो आहोत, जीआर रद्द केलं तर आम्हीही याचिका मागे घेऊ. त्यामुळे विखे पाटील यांनी GRचा विषय न्यायप्रविष्ठ आहे, असे कारण देऊन भूलथापा करू नये, बनवाबनवी करू नये. असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील या महान नेत्याची विखे पाटील यांच्या मागे कृपा

राठा उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांना भाजपने मराठा नेता केले आहे, मात्र ते किती दिवस नेता म्हणून राहतील हे माहीत नाही. मनोज जरांगे पाटील या महान नेत्याची विखे पाटील यांच्या मागे कृपा आहे. प्रतिभा धानोरकर यांचे बॅनर मोर्चा स्थळी गैरसमजुतीतून लागले असावे, त्यांना कदाचित बॅनर पोस्टर लावायचे नाही, हे माहीत नसावे. म्हणून ते बॅनर, पोस्टर लागले असावेत. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Continues below advertisement

आणखी वाचा