Vasant More Meet Uddhav Thackeray: मुंबई: पुण्यातील वसंत मोरे (Vasant More) आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. मातोश्री राज दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


वसंत मोरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हेसुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा  आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी  वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.


लोकसभेच्या निवडणूकीत पराभव-


मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला. वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.


संबंधित बातमी:


Vasant More: कोकणात जाऊन मासे न खाताच माघारी परतले! कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजीत पानसेंची माघार; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं