Amit Shah in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेसध्यामुंबईच्यादौऱ्यावरआहेत. काल (शुक्रवारी) रात्रीत्यांचंआगमनझालं. दरवर्षीप्रमाणेयंदादेखीलअमितशाहहेआज लालबागच्याराजाचंदर्शनघेणारआहे. यासहतेमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस यांच्याघरीजाऊनगणरायाचेदर्शनघेणारअसल्याचीमाहितीआहे.

दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याशी चर्चा केल्याचीमाहितीसमोरआलीआहे. राज्यातील मराठा आरक्षणासह, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचेबोललंजातआहे. सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून माहिती जाणूनघेतली. त्यामुळेयाबैठकीतनेमकंकायठरलंआणिसध्यासुरुअसलेल्याआंदोलनावरकाहीतोडगानिघालाका? हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचाआजचा दुसरादिवस

दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मराठा आरक्षणासाठी कालपासून मुंबईच्या आझाद मौदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे. आजयाउपोषणाचादुसरादिवसआहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावे असं जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला एकेक दिवस मुदवाढ देण्यापेक्षा कायमस्वरुपी दिली तरीही हे उपोषण निर्णय होईपर्यंत सुरु राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचामुंबईदौरामहत्वाचामनालाजातोय. परिणामीयावरकाहीतोडगानिघूनआरक्षणाचाप्रश्नमार्गीलागतोका? हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा स्वागतासाठी अंधेरीनगरी सज्ज

सध्यामुंबईच्यादौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंधेरीत पहिल्यांदा गणपती मंडपात बाप्पाचे दर्शनासाठी येत असल्यामुळे अंधेरीकरांमध्ये मोठा उत्साह आहे. अमित शाह शनिवारी दुपारी दीड वाजता अंधेरी पूर्वेत ओल्ड नागरदास रोडवर असलेल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपती मंडपात विराजमान बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मागील 30 ते 35 वर्षापासून गुजरात राज्याचे राज्यमंत्री पुरुषोत्तम भाई सोलंकी यांच्याकडून गणपती बाप्पा विराजमान होत आहे. मोगरेश्वर गणपती मंडपात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची कालपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल आणि पुरुषोत्तम भाई सोलंकी गुजरात राज्याचे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपती बाप्पाचे दर्शनासाठी पहिल्यांदा अंधेरीत येत आहेत.

ही बातमी वाचा: