Umesh Patil on Rajan Patil: सोलापूरच्या (Solapur News) मोहोळमध्ये (Mohol) शिवसैनिक पंडित देशमुख (Pandit Deshmkh) यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा पेटला असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर घणाघाती आरोप केलाय. त्यामुळे 2005 मध्ये झालेल्या पंडित देशमुख हत्येचे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आले आहे.

Continues below advertisement


Umesh Patil on Rajan Patil: नेमकं काय म्हणाले उमेश पाटील?


मोहोळमध्ये भाषण करताना उमेश पाटील म्हणाले की,राज पाटलांविरोधात आवाज उठवला म्हणून पंडित देशमुख यांची हत्या केली. तुमचा शिवसैनिकाची जीभ काढली, पाणी मागत असताना तोंडात लघुशंका केली. बदला म्हणून शिवसैनिकांनी त्या युवा नेत्याला मोहोळमध्ये पाय ठेवू दिले नव्हते.  स्वतःला शिवसैनिक म्हणणाऱ्या नेत्यांनी त्यांच्याकडे जाऊन संधान बांधले आणि आमच्या एकीला छेद दिला. मोहोळमध्ये आपण निधी दिला, त्यात माजी आमदार ठेकेदारकडून टक्केवारी वसुल करतोय. आम्हाला चिन्ह, पक्ष महत्वाचा नाही. राजन पाटलांचा पराभव महत्त्वाचा आहे. अनगरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना AK47 घेऊन संरक्षणात जावे लागले. अनगरची घाण मोहोळमध्ये येऊ द्यायची नसेल तर धनुष्यबाण निवडून दिला पाहिजे. तडीपार असलेल्या दोन माणसांना उमेदवारी दिली, असे महंत त्यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.


Eknath Shinde: शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : एकनाथ शिंदे


तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंडित देशमुख यांचा मर्डर झाल्याचं जे उमेश पाटील यांनी सांगितलं, त्यामध्ये जो कोणी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. चुकीला माफी नाही, म्हणून तुम्हाला जो कोणी वकील, हरीष साळवे वगैरे वकील पाहिजे, त्याची नेमणूक करण्याचे काम आम्ही करू. शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. महाराष्ट्रात अशी गुंडागर्दी खपवून घेणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. मी ज्याच्या मागे उभा राहतो, त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. परिणामाची चिंता करत नाही. तुम्हा सर्वांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.


Pandit Deshmukh Case: पंडित देशमुख हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी


दरम्यान, 2005 मध्ये शिवसेनेचे उपतालुका प्रमुख पंडित देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांच्यासह 13 जणांवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. मात्र, आता उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर टीका केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 



आणखी वाचा


Pankaja Munde PA Anant Garje Wife: गौरी गर्जेचा संशयास्पद मृत्यू, पंकजा मुंडेंच्या पीएवर गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...