Uddhav Thackeray On Eknath Shinde: व्यगंचित्रकार काय असतो, व्यगंचित्रकार काय करू शकतो, याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मुंबईत, महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि देशात हिंदूंचं काय झालं असतं, हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांना लगावला टोला
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, ''काहींना असं वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे. जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. तसं नाही आहे. शिवसेनेची पायमुळं 62 वर्ष तर सरळ दिसत आहेच, पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबानी या विचारांची पेरणी केली आहे.''
'विचाराने माणूस थकता कामा नये'
मार्मिक बद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''आजोबा बाळासाहेब म्हणायचे विचाराने माणूस थकता कामा नये.'' ते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. बाळासाहेबांनी विचार केला आणि व्यंगचित्र साप्ताहिक काढले. मुंबई मिळवली तरी मराठी माणसावर अन्याय होताच त्याची वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना आणि व्यंगचित्र काढली. आता व्यंगचित्रकार किती हा वादाचा विषय पण व्यंगचित्रकार असायलाच हवा. महाराजांच्या काळात जे शाहीर काम करायचे ते व्यंगचित्रकाराच्या रेषेत सामर्थ्य.
'नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक'
उद्धव ठाकरे म्हणाले, ''8-10 दिवसापूंर्वी नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक आहे. एकच पक्ष टिकणार इतर पक्ष संपणार.'' कोणी काही केलं तरी शिवसेना संपणार नाही, असं ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''सगळे मिळून संघ राज्य पद्धत. प्रादेशिक पक्ष संपवायचे हे नड्डांचे मत आहे का? अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. सध्या सोशल मिडियाचा जमाना पण ते सोसल का? लष्करात कपात करण्याची बातमी धोकादायक. लष्कर प्रचंड असायलाच हवे. चीन अमेरिका यांनी आधुनिकीकरणासाठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत. पण सैन्यासाठी नाही.''