Shiv Sena UBT Lok Sabha Canditate List : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाने अखेर आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ( Shiv Sena UBT Candidate List) केलीय. एकूण 17 उमेदवारांच्या या यादीत सध्याच्या विद्यमान खासदारांसह नव्या चेहऱ्यांना संधी देत ठाकरे गटाने फेस चेंजची खेळी खेळली आहे. अशातच या यादीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) मध्ये विदर्भातील दोन मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाले असून बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघांचा समावेश आहे. तर उर्वरित चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
विदर्भात 'या' उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर यंदाची लोकसभा निवडूनक उद्धव ठाकरे यांना अतिशय महत्वाची आणि आव्हानात्मक ठरणार आहे. म्हणूनच शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येक उमेदवार अतिशय तोलून-मापून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशातच आज जाहीर झालेल्या 17 उमेदवारांच्या यादीत बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आली असून यात विदर्भातील काही महत्वपूर्ण जागेबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.
कोण आहेत संजय देशमुख?
- संजय देशमुख यांनी 1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरू केली. त्यावेळी ते संजय राठोड यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते.
- मात्र, 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता.
- संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत.
- संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते.
- 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतं.
नरेंद्र खेडेकर यांच्या नावाला पसंती
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अखेर नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे उभे राहिले आहेत. नरेंद्र खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख असा प्रवास करत ते आता सध्या बुलढाणा मध्ये जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याने अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये बुलढाणा, चिखली, खामगाव, सिंदखेडराजा, मेहेकर, जळगाव जामोद हे विधानसभा क्षेत्र येतात.
इतर महत्वाच्या बातम्या