मुंबई : बदलापूरच्या (Badlapur School Abuse Case) घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) कडाडून टीका केली आहे. तसेच शनिवारचा म्हणजे 24 महाराष्ट्र बंद राजकीय नाही असं स्पष्टीकरण देखील उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या 24 ऑगस्टला बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल मुली शाळेत जाताय. पण त्या सुरक्षित नसतील तर मग महाराष्ट्र कुठे पुढे जातोय? फक्त कालची घटना नाही तर अश्या अनेक वृत्त पत्रातील बातम्या सुद्धा मी आणल्या आहेत. बंगालमध्ये जे कृत्य घडलं त्यात देशभरात आगडोंब उसळला. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं तेव्हा सुद्धा असाच झालं होतं. बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही.. कठोर शिक्षा यामध्ये व्हावी सुरक्षित बहीण ही प्राथमिकता आहे... बहीण सुरक्षित असेल तर ती लाडकी होऊ शकते. म्हणून महाराष्ट्रतल्या जनतेला आवाहन करतो 24 ऑगस्टला बंदमध्ये साथ द्या... उठो द्रौपदी शस्त्र उठाओ म्हणतो... पण ही कडेवारची मुलगी कुठे शस्त्र उठाओ.. जनतेचा आक्रोश आहे... त्यासाठी हा बंद आहे ..स्वतः हून हा बंद पाळला पाहिजे..
बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच : उद्धव ठाकरे
राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरला आहे. ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री यांचे घरं आहे. हे दुष्कृत्य ते मान्य करताय का? पोलिस ढिम्म आहेत म्हणून जनता पेटून उठली. नाहीतर काय करणार.. मुख्यमंत्री कुठे होते? ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधत होते... राख्याला तरी जागा ...मुख्यमंत्री यांना बदलापूरला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये होते जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं , असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला
आपण नेमकं कसं जगतोय याबद्दल सगळ्या महिला माताभगिनींमधे प्रश्न आहे. केवळ राजकारण म्हणून नाही तर राज्यातल्या परिस्थितीबद्दल सगळे राजकीय पक्ष चिंतेत आहेत. आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा... आता मी स्पष्ट बोलतो. जनतेचे पैसे घेऊन तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली .आता जर यां सगळ्या घटनेमध्ये राजकीय हात वाटत असेल तर तुम्ही स्वतः विकृत आहत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
क्षमता नसलेला हा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री तुम्ही थोडे दिन के मेहमान हो... मुख्यमंत्री म्हणत असतील दोन महिन्यात फाशी दिली एका आरोपीला तर त्याची SIT नेमा आणि कोणाला फाशी दिली ते सांगा... क्षमता नसलेला हा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी बदलापूर ला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये होते जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं. ही शाळा भाजपच्या लोकांची होती खरं खोटं माहिती नाही . वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला नसता. सुषमा अंधारेंनी आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झालं.
मी लवकरच बदलापूरला जाणार : उद्धव ठाकरे
शक्ती विधेयक आम्ही आणणार होतो. शक्ती विधेयक आम्ही आणले म्हणूनच सरकार पडलं का? विकृती दूर करण्यासाठी 23 तारखेला शहरातील ग्रामीण भागातील सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बंद करावा . बदलापूरला जायचं आहे. मी बदलापूरला जाईल पण सध्या त्या पालकांना त्रास मला द्यायचा नाही...मी जाईल... मी काही स्थानिकांना बोलवलं आहे... काही आमचे पदाधिकारी यांना सुद्धा बोलवलं आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.