मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन, अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar PC) हत्याकांडासह राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला. कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जे गृहमंत्री आहेत, त्यांना मी कलंक म्हणालो होतो, पण आता ते मनोरुग्ण गृहमंत्री आहेत का असा सवाल आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. याशिवाय मॉरिसने अभिषेकला गोळी मारल्यांचं आणि मॉरिसने आत्महत्या केल्याचं फुटेज बाहेर आलं नाही, ते दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं फेसबुक लाईव्हदरम्यान दिसलं. पण ज्या मॉरिस नोरोन्हाने गोळीबार केल्याचं म्हटलं जातं ते त्यामध्ये दिसलं नाही. मॉरिसने नंतर आत्महत्या केली. ती आत्महत्या त्याने का केली असावी? अभिषेकची हत्या झाली, गुंडाने ती हत्या केली. या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा संशय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Uddhav Thackeray PC)
गेले काही दिवस उदविग्न अवस्था आहे. बेबंधशाही सुरु आहे. महाराष्ट्राची जनता कमालीची दुखावली गेली आहे. गुंडाचा हैदौस महाराष्ट्रामध्ये सुरु आहे.
सरकारमध्ये गँगवॉर सुरु आहे. गुंडासोबत मंत्र्याचे फोटो समोर येतायत.
अभिषेकची हत्या झाली, गुंडाने ती हत्या केली. या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा संशय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यपालांनी या गुंडाचा सत्कार केल्याचे फोटो समोर आलेत, सत्कार करताना पार्श्वभूमी तपासली जात नाहीत का? काल निखिल वागळे असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तो हल्ला भाजपच्या लोकांनी केला.
देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)
फडणवीस यांना कलंक फडतूस शब्द वापरले. पण आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का? फडणवीस असे बोलले की, श्वान गाडीखाली आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्यांची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वरांसमोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलावतात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
रश्मी शुक्लांवर हल्लाबोल (Uddhav Thackeray on Rashmi Shukla)
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बाईंनी पत्र लिहिलं. असं पहिल्यांदा होतंय की पोलीस महासंचालक अशाप्रकारे पत्र समोर आणताय.
राज्य सरकार भरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आम्ही जनता न्यायालयात करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यपालपदाचा अर्थ राहिला नाही
आम्ही राज्यपालाकडे जाणार नाही, त्यापदाचा काही अर्थ राहिला नाही. माझी तळमळ सर्वोच्च न्यायालय समजून घेऊन लवकर निर्णय घेईल. एकच अशा आता सर्वोच न्यायलयाकडून आहे. सर्वोच न्यायलयाने नुसतं झापू नयं, न्यायालयाचं झापालंय होऊ नये. लवकर निवडणुका जाहीर करतील किंवा यावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray PC VIDEO : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
संबंधित बातम्या
Uddhav Thackeray : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची पहिली मोठी मागणी