Uddhav Thackeray on Narendra Modi : " मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. ते वकिल आहेत. निवडून आल्यानंतर कोणती कामे करायचे याचे संकल्पपत्र आम्ही जाहीर केलेलं आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य असे की इथे जनता सुशिक्षित आहेत. मी अनिल परब यांना धन्यवाद देतो, त्यांनी माझा मतदार म्हणून उल्लेख केला. कारण माझं सर्टिफिकेट खरं आहे. बाकी काही मला म्हणायचं नाही", असा टोला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई पदवीधरच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संकल्पनामा जाहीर केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
गेल्या 5 टर्म तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिले
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत पदवीधर मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर प्रथम आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. अत्यंत सुसंस्कृत आणि त्यांचे भाषेवर असणारे प्रभुत्व तुम्हाला माहिती आहे. पदवीधर मतदारांचे प्रश्न वेगळे असतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांचे प्रश्न असतातच पण शिक्षण घेतल्यानंतर काही वेगळे प्रश्न देखील त्यांच्यासमोर असतात. मी मुंबई पदवीधर मतदारसंघातील मतदारांना हात जोडून विनंती करतो, गेल्या 5 टर्म तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिले. त्या नात्याला आम्ही अधिक दृढ करु. आपल्या समस्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करु. पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेला आशीर्वाद द्याल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई पदवीधरसाठी 26 जूनला आहे, त्यादिवशी सुट्टी नाहीये
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पदवीधरसाठी 26 जूनला आहे, त्यादिवशी सुट्टी नाहीये. कामावर जाण्यापूर्वी मतदान करावं. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी माझं आणि संजय राऊतांचे बोलणे झाले. आम्ही अर्ज मागे घेत आहोत, मला याबद्दल काही आता बोलायचं नाही. मोहन भागवत म्हणताय मणिपूर जळतंय. मोदी तिथे जाणार आहेत की नाही? मोहन भागवत जे बोलले ते मोदी मनावर घेणार का? नड्डा बोलले होते आम्हाला संघाची गरज नाही त्यांची गरज संपली आहे. 370 काढलेल नाही पण होल्ड वर ठेवलं आहे . उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲड अनिल परब यांचे निवडणूक संकल्पपत्र जाहीर केले. यावेळी ते बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray Full PC : दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या फोननंतर कोकण, नाशिकबाबत समझोता