Uddhav Thackeray on Amit Shah: ''काल पुण्यात कोणी आलं होतं (अमित शाह), त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते (अमित शाह) म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)  यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्यावर केली आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.


Uddhav Thackeray on Amit Shah: 'तुम्ही आमच्या पक्षात आले तर, तरच तुम्ही हिंदू. नाही तर तुम्ही हिंदुत्व सोडलं'


अमित शाह (amit shah) यांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे (uddhav thackeray)  म्हणाले की, ''हे मोगॅम्बो आहेत. तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत. हिंदू असाल तरी लढा, आमच्यासोबत जे आहेत, तेच आमचे. हिंदू असो की कोणी दुसरा, त्याने फरक पडत नाही. तुम्ही आमच्या पक्षात आले तर, तरच तुम्ही हिंदू. नाही तर तुम्ही हिंदुत्व सोडलं.'' ते म्हणले, ''अडीच वर्ष मी (uddhav thackeray) मुख्यमंत्री होतो, कुठं माझं चुकलं. मी कधी आपसात भांडण लावली? कधी शिवसेनेनं आपसात लढाई लावली आहे. कधीच नाही.''


Uddhav Thackeray on Amit Shah: मी काँग्रेससोबत गेलो नाही, भाजपने मला ढकललं: उद्धव ठाकरे


महाविकास आघाडीबद्दल (maha vikas aghadi) बोलताना उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले की, ''मी काँग्रेससोबत गेलो नाही, तर भाजपने (BJP) मला ढकललं आहे. मला हे यासाठी सांगायचं आहे की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये. 2014 मध्ये मी युती तोडली नव्हती. भाजपने (BJP) युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदू होतो, आजही मी हिंदू आहे. त्यावेळी तुम्ही (BJP) युती तोडली, नंतर शेवटी त्यांना आमची गरज लागली.'' ते (uddhav thackeray) म्हणाले, ''भाजपला (BJP) असं वाटलं होतं ते स्वतःच्या दमावर सत्ता सांभाळतील, मात्र त्यांना ते जमलं नाही, शेवटी आमची मदत घ्यावी लागली.''