मुंबई : "वंचित बहुजन आघाडीशी आमची बोलणी सुरु आहे. दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासमवेत शिवसेनेचे 2 नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. याशिवाय, शिवसेना, राष्ट्रवादी वंचित अशा महाविकास आघाडीतील पक्षांशी एकत्रित बैठक घेतली जाईल. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करु. 12-12 जागांचा कोणताही फॉर्म्युला अद्याप माझ्यासमोर आलेला नाही," असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. ठाकरे यांनी लोकसभेसाठी जागावाटप, राममंदिर, मुंबईतील प्रश्नांवर यावेळी भाष्य केले.
ठाकरे म्हणाले, आम्ही जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. काँग्रेसकडूनही अद्याप कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जागावाटपाचा प्रश्न सुटलाय. देश वाचवायचा, लोकशाही वाचवायची आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. मुंबईत भ्रष्टाचाराची फार घाण झालेली आहे, ती साफ करायची आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
राम मंदिरासाठी शिवसेनचे मोठे योगदान - ठाकरे (Uddhav Thackeray)
राम मंदिराच्या लोकार्पणासाठी मला निमंत्रण आलेलं नाही. अयोध्येत राम मंदिर होतय ही आनंदाची गोष्ट आहे. शिवसेनेचं राम मंदिरासाठी मोठ योगदान आहे. शिवसेनाचा मोठा संघर्ष आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार राम मंदिरासाठी लढा दिल्यामुळे हेरावून घेण्यात आला होता. शिवसेनेने राममंदिरासाठी पक्षनिधीतून योगदान दिले होते. मी यापूर्वी दोनदा अयोध्येत गेलोय, असे उद्धव ठाकरे स्पष्ट केले. राम मंदिराचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये, अशी माझी इच्छा होती. देवेंद्र फडणवीस बाबरी मशीदीच्या घुमटावर चढले असतील आणि त्यांच्या वजनामुळे बाबरी पडली, असेल असा उपासाहत्मक टोलाही ठाकरे यांनी लगावला.
जिथे सत्ता असते तिथे, गर्दीचा ओघ असतो, पण इथे वेगळंय : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
"आज तुम्ही सर्वांनी पक्षप्रवेश केला. इथे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही इथे आलात. काही आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारीनं जे गेलेले आहेत, हाच स्वाभिमान आणि लाचारीतला फरक आहे. जिथे सत्ता असते तिथे, गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळं आहे. मला तुमचा उत्साह सांगतोय की, तिथे प्रचाराला येण्याची गरज नाही, आजच तिथे मावळमध्ये भगवा फडकला आहे. हा मावळ मतदारसंघ वेगळा आहे. तरी मी प्रचाराला तर येईलच.", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या